जिथे सर्वसामावेशक विकास घडलेला असेल,
जिथे शेतकरी समाधानी असतील,
जिथे सर्वसामान्यांपर्यंत सोयीसुविधा पोहोचलेल्या असतील,
जिथे गुंडागर्दीला जागा नसेल,
जेथील युवा सुशिक्षित व उद्योगशील असेल,
जेथील महिला सुरक्षित असून त्यांची रोजगाराभिमुख दिनचर्या असेल,
जिथे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीचा आनंद घेऊ शकतील,
जेथील वातावरण हे नेहेमी शांत, विकासाभिमुख, सर्वसामावेशक असेल
असा माझा अहमदनगर जिल्हा मला बनवायचाय.
हेच माझे स्वप्न आहे, हे सर्व अहमदनगरवासियांचे स्वप्न आहे.

ग्रामीण आरोग्य

विविध ठिकाणी ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबीर व रक्त दान शिबिराच्या माध्यमातून ५० हजार पेक्षा जास्त रुग्णांना लाभ मिळाला

सामाजिक योगदान

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व अपंग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा केंद्राची उभारणी व विशेष उपचाराची सुविधा.

सहकार

शिर्डी मतदारसंघातील सर्व नागरिकांना आरोग्य विमा कवच स्वखर्चाने उपलब्ध करून दिले . आज अखेर २ कोटी रुपयांचा विमा परत लाभ मिळवून दिला.

सामाजिक योगदान

लेक वाचवा अभियाना अंतर्गत महिलांचा सन्मान आणि बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे यशश्वी आयोजन

ग्रामीण आरोग्य

मोफत अँजिओग्राफी , अँजिओप्लास्टी, हृदयशस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, साधें आणि खुब्यावरील शास्त्रक्रिया, कॅन्सर उपचारावर मार्गदर्शन आणि शास्त्रक्रिया केंद्र.

संघठन

विविध शासकीय योजनांचा लाभ थेट गरजूंना मिळवून दिल्याने समाजात सर्व सामाजिक संघटनांच्या विश्वासास पात्र – लेक वाचवा अभियानातून युवक, युवतींचे मोठे संघटन

लोणी खुर्द आणि लोणी बुद्रुक येथील वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना
सहाय्यक साधने वाटप.

अहमदनगर वासियांचे स्वप्न होत आहे साकार…
शहरातील उड्डाणपूल घेत आहे आकार!!

"गोरगरीब जनता व शेतकरी हेच माझे दैवत व त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असा विचार कायम ठेऊन जनतेच्या गरजेसाठी, विकासासाठी, आरोग्यासाठी, कल्याणासाठी विविध संस्थांच्या मार्फत सेवा देणे ही गरज आम्ही ओळखली.

शेतकरी, कामगार व इतर कष्टकरी वर्गाच्या समस्या त्यांच्यामध्ये जाऊन समजावून घेणे व त्यावर त्वरित काम करणे हीच सच्च्या लोकसेवकाची ओळख आणि आपुलकीची प्रचिती आहे."

history

"देशातील गरीब जनता पैशांअभावी योग्य ती आरोग्य सेवा मिळवू शकत नाहीत त्यासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत आहोत.

ग्रामदिन भागातील जनतेला; या अनेक गंभीर व दुर्मिळ रोगांवर मोफत उपचार आणि निदान या आरोग्य शिबिरांद्वारे करून लोकसेवा केली जाते."

Arogya Shibir