अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मी कायरत आहे. सहकार चळवळी जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व माझे आजोबा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन, मी सामाजिक बांधिलकीने जिल्ह्यात काम करीत आहे. विरोधी पक्षनेते मा. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील यांचे बहुमोल असे मार्गदर्शन माझ्या या सामाजिक राजकीय कार्याला मिळत आहे.

history

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन या नात्याने काम पाहत असताना सहकार चळवळ जिवंत रहावी म्हणून जिल्ह्यात बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना आणि डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेऊन, या दोन्ही ही तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अहमदनगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन च्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्या असून या भागात विविध तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, ग्रामीण भागातील रुग्णांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने मी व्यक्तिशः प्रयत्न करीत आहे

history

आज पर्यंत अनेक शिबिरे आयोजित केली असून या माध्यमातून हजारो रुपयांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा हा जिरायती पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात आपण लोकसहभागातून जलक्रांती अभियान राबवले. या माध्यमातून गावपातळीवर असलेले जुने नाले पुनःजीवित करून, त्यात पाणी साठवले जाते याचा लाभ संबंधित गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी झाला आहे हे मला अभिमानाने नमूद करावे वाटते.

movements

शेती क्षेत्रात असलेल्या अपयशामुळे जिल्ह्यात दोनशे आठ कुटुंबिये विखे पाटील परिवाराने दत्तक घेतली असून या परिवारातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, विवाहा साठी मदत करण्यात येत आहे. देश पातळीवर असा उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोफत अपघात विमा योजनेचा हा उपक्रम नगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत एक लाख पन्नास हजार नागरिकांचा विमा उतरवण्यात आला असून, या विम्याची रक्कम जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे आत्तापर्यंत एकशे दोन कुटुंबियांना दोन कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ मिळवून दिला आहे.

movements

विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याची विकासाची कामे सध्या सुरु असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांच्या माध्यमातून या विकासाच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या बरोबर व्यक्तिशः माझाही पाठपुरावा सातत्याने चालू असतो. पक्षीय स्तरावर संघटात्मक बांधणी भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शना खाली आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या साहाय्याने सातत्याने सुरु आहे.

history